काँग्रेसवाले रोखतायत मनसेला महायुतीत येण्यापासून -आठवले

October 10, 2013 3:58 PM0 commentsViews: 1758

ramddas athavale10 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत आले नाही आले तरी आमचा विजय निश्चित आहे. पण जर राज महायुतीत आले तर 20 ते 30 जागा वाढतील मात्र राज यांना काँग्रेसवाले महायुतीत येऊ देत नाही असा खुलासा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

 

तसंच पुन्हा एकदा त्यांनी युतीला इशारा दिलाय. ऑक्टोबर अखेर शिवसेना-भाजपनं आम्हाला कोणत्या जागा देणार हे स्पष्ट केलं नाही तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला ते शिर्डीत बोलत होते. लोकसभेच्या जागेसाठी युतीने लोकसभेसाठी चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.

 

मात्र राज्यसभेची जागा देण्यास असहमती दर्शवली असून जागेचा निर्णय भाजपकडे ढकलला आहे. राज ठाकरे महायुतीत यावं यासाठी भाजपच्या नेत्यांनी वारंवार पर्यंतने केले एव्हाना उद्धव ठाकरे यांनी टाळीसाठी हातही पुढे केला पण राज यांनी टाळी देण्यास स्पष्ट नकार दिला. एकीकडे युतीचे नेते राज यांना मागणी घालत होते तर दुसरीकडे मनसे जर युतीत आली तर रिपाइं बाहेर पडले असा इशारा आठवलेंनी दिला होता. मात्र अलीकडे आठवलेंनी आपला विरोध बाजूला सारत राज यांनी युतीत येण्याचं आवाहन केलं होतं.

close