200 व्या टेस्टनंतर सचिन घेणार निवृत्ती

October 10, 2013 4:21 PM0 commentsViews: 1706

10 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, विक्रमादित्य, क्रिकेटचा शहेनशहा अशा अनेक नावाने ओळखला जाणारा आणि लाखो क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला आपला सचिन..आता क्रिकेट जगताला अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बीसीसीआयला तशी माहिती कळवली असून बीसीसीआयनेही त्याला परवानगी दिली आहे. सचिनने बीसीसीआयला लेखी कळवलंय. नोव्हेंबरमध्ये भारतीय टीम मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यातली दुसरी टेस्ट सचिनची ऐतिहासिक 200वी टेस्ट मॅच असणार आहे आणि या मॅचनंतर सचिन निवृत्त होणार आहे. 18 नोव्हेंबर 2013 ला सचिन शेवटची मॅच खेळणार आहे.
sachin riter

माझ्या संपूर्ण जीवनात भारतासाठी क्रिकेट खेळणं हेच माझं स्वप्न होतं. गेल्या 24 वर्षांपासून हेच स्वप्न मी जगलोय. वयाच्या 11 व्या वर्षांपासून मी क्रिकेट खेळतोय. त्यामुळे क्रिकेटशिवायच्या आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही अशी भावना सचिनने व्यक्त केली.

 

तसंत देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि जगभरात क्रिकेट खेळणं हा माझ्यासाठी गौरव आहे. देशात 200 वी मॅच खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. इतकी वर्षं माझ्यासाठी सर्व काही करणार्‍या आणि मला वाटलं तेव्हा मला निवृत्तीची परवानगी देणार्‍या बीसीसीआयचा मी आभारी आहे. कुटुंबीयांनी जो समज आणि संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो. त्यांची प्रार्थना आणि त्यांच्या सदिच्छामुळेच मला पुढे जाण्याचं आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याचं बळ मिळालं असंही सचिन म्हणाला. सचिनच्या निवृत्तीमुळे क्रिकेटमधल्या महापर्वाचा अस्त होणार अशी प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे.

बीसीसीआयनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सचिननं म्हटलंय,

‘माझ्या संपूर्ण जीवनात भारतासाठी क्रिकेट खेळणं हेच माझं स्वप्न होतं. गेल्या 24 वर्षांपासून हेच स्वप्न मी जगलोय. वयाच्या 11 व्या वर्षांपासून मी क्रिकेट खेळतोय. त्यामुळे क्रिकेटशिवायच्या आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. देशाचं प्रतिनिधीत्व करणं आणि जगभरात क्रिकेट खेळणं हा माझ्यासाठी गौरव आहे. देशात 200 वी मॅच खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. इतकी वर्षं माझ्यासाठी सर्व काही करणार्‍या आणि मला वाटलं तेव्हा मला निवृत्तीची परवानगी देणार्‍या बीसीसीआयचा मी आभारी आहे. कुटुंबीयांनी जो समज आणि संयम दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी माझ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो. त्यांची प्रार्थना आणि त्यांच्या सदिच्छामुळेच मला पुढे जाण्याचं आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याचं बळ मिळालं.’ -सचिन तेंडुलकर

close