सीमांध्रमधला वीज कर्मचार्‍यांचा संप तात्पुरता मागे

October 10, 2013 1:02 PM0 commentsViews: 62

Telangana issius10 ऑक्टोबर : तेलंगणाविरोधात सीमांध्रमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तब्बल 8 हजार वीज कर्मचार्‍यांची संपावर गेले होते अखेरीस आज वीज कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घेतलाय.

 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्याशी चर्चेनंतर संप तात्पुरता मागे घेण्यात आला. संपामुळे 5 जिल्ह्यांतल्या वीजपुरवठा ठप्प होता. या संपामुळे पाच जिल्हे काळोखात बुडाले होते.

 

याचा मोठा फटका हॉस्पिटल्सला बसला होता आरोग्यसेवा कोलमडल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले होते. तसंच पेट्रोल पंप आणि एटीएम सेंटर्सही बंद पडले होते. अखेर चक्रीवादळाच्या धोक्यामुळे वीज कर्मचार्‍यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

close