नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदासाठी उत्तम पर्याय -गुलाबचंद

October 10, 2013 1:07 PM0 commentsViews: 1131

ajit gulabchand10 ऑक्टोबर : देशाला सध्या बदलाची गरज आहे, आणि नरेंद्र मोदी हाच देशापुढचा सर्वोत्तम पर्याय असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय उद्योगपती अजित गुलाबचंद यांनी वक्तव्य केलंय.

 

शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या गुलाबचंद यांनी मोदींचं केलेलं हे कौतुक ऐकून राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहे. अजित गुलाबचंद हे लवासाचे प्रवर्तक आहेत.

 

त्यांनी आज पुण्यात केंद्रातल्या यूपीए सरकारवर जोरदार टीका केली आणि मोदींचं कौतुक केलंय. मोदी हे मार्केट फ्रेंडली आहेत, ते नवीन रोजगाराबद्दल बोलतात, गुंतवणुकीबद्दल बोलतात, उद्योगांच्या विकासाबद्दल बोलतात म्हणून मला ते पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार वाटतात असं गुलाबचंद यांनी म्हटलंय.

close