नाशिकच्या महापौरांचं ‘खळ्ळ-फटॅक’

October 10, 2013 2:06 PM0 commentsViews: 533

yatin wagh10 ऑक्टोबर : नाशिकचे महापौर यतीन वाघ यांनी स्वच्छता कर्मचार्‍याला मारहाण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आलीय. पण महापौरांनी कर्मचार्‍यांचे आरोप फेटाळून लावलेत.

 

शंतनु बोरसे असं कर्मचार्‍याचं नाव आहे. सराफ बाजार या महापौरांच्या वॉर्डात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापौरांनी त्याबाबत सकाळी पाहणी केली. त्यावेळी उपस्थित स्वच्छता कर्मचार्‍याशी त्यांचा वाद झाला.

 

यावेळी महापौरांनी मारहाण केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केलाय. महापौरांनी आपल्याशी असं वागायला नको हवं होतं. त्यांनी सांगितलं असतं तर मी ऐकलंही असतं. हा वॉर्ड माझ्या हद्दीत नव्हता त्यामुळे मी नकार दिला. या बाबत आरोग्य अधिकार्‍यांशी बातचीतही झाली होती पण महापौरांनी माझं ऐकलं नाही आणि अरेरावी केली असं बोरसेचं म्हणणं आहे.

 

तर मी आरोग्य अधिकार्‍यांना आणि स्वच्छता अधिकार्‍यांना कचर्‍याची कुंडी उचलली पाहिजे असं सांगून मी निघून गेलो. त्यावेळी तेथील दोन कंत्राटदारांचं हद्दीवरून वाद झाला होता. त्यानंतर कर्मचार्‍यांनी मारहाणीची तक्रार दाखल केल्याचं कळालं. पण कर्मचार्‍यांना मारहाण झाली नाही असं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं.

close