वेगळ्या विदर्भासाठी मतदान

October 10, 2013 10:07 PM0 commentsViews: 376

vidharbha10 ऑक्टोबर : ‘विदर्भ माझा’या अराजकीय संघटनेच्या वतीनं वेगळ्या विदर्भासाठी मतदान घेतलं. सकाळी 9 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालीय. शहरातील 200 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आलं. शहरातील विद्यार्थी तसंच नागरिकांचा या मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

 

रात्री 10 पर्यंत मतदान घेण्यात आलं. आता याची मतमोजणी उद्या होणार आहे. आज सकाळी आमदार डॉ.अनिल बोडे, आमदार रवी राणा,आमदार प्रवीण पोटे, नवनीत राणा, भाजपचे राज्याचे प्रवक्ते किरण पातुरकर, माजी मंत्री अजहर हुसैन, केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रा.सु. गवई या राजकीय मंडळींनी मतदानात सहभाग घेतला.

 

समाजकार्य महाविद्यालय आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या एमबीएचे 300 विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी आहेत.

close