महाराष्ट्रात साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

February 3, 2009 4:58 PM0 commentsViews: 6

3 फेब्रुवारी, मुंबई राज्यात जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची नवी गुंतवणूक येऊ घातलीय. उत्तम ग्यालवा, आशापुरा माईन केम, गोपानी प्रायव्हेट लिमिटेड, टॉपवर्थ ग्रुप आणि अभिषेक कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्या आणि राज्य सरकार दरम्यान सामंजस्य करारावर सह्या झाल्या. स्टील, ऍल्युमिनिअम फॅब्रिक आणि खाण उद्योगातले हे प्रकल्प रायगड, वर्धा, चंद्रपूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत. यापैकी तीन प्रकल्पातून 362 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे जवळपास अडीच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या नव्या गुंतवणुकीबाबतचं आपलं धोरण मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.

close