आसारामच्या निवासस्थानी मुलींना पाठवलं जातं,सहकार्‍याची कबुली

October 10, 2013 10:13 PM1 commentViews: 1528

asaram bapu arrest_12310 ऑक्टोबर : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साई अडचणीत आलेत. आश्रमात नियमितपणे मुलींना आणलं जात होतं. आणि त्यांना आसारामच्या निवासस्थानी पाठवलं जात होतं, अशी माहिती अजयकुमारनं दिली.

 

आश्रमात दोन कर्मचार्‍यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचंही त्यानं सांगितलं. आसारामचा माजी सहकारी अजयकुमारला जोधपूर कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानं ही धक्कादायक कबुली दिलीय. 1995 मध्ये तो आसारामच्या आश्रमात काम करत होता. दुसरीकडे आसारामची कोठडी मिळवण्यासाठी गुजरातचं पोलीस पथक जोधपूरमध्ये दाखल झालंय.

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पोलीस संचालकांना बोलावून तपासाबाबतची माहिती घेतली. दरम्यान, आसारामचा मुलगा नारायण साई फरार आहे. आसाराम बापूवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला असून तो पोलीस कोठडीत आहे तर अलीकडेच सुरतमध्ये दोन तरूणींनी आसाराम आणि साई नारायणविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केलीय.

  • arvind

    Hang the buggers !

close