डेन्मार्क ओपन स्पर्धेसाठी ज्वाला गुट्टाचा मार्ग मोकळा

October 10, 2013 10:25 PM0 commentsViews: 252

javala gutta10 ऑक्टोबर : अखेर भारताची महिला दुहेरीतली बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा खेळण्याचा मार्ग मोकळा झालाय, ज्वाला गुट्टाला दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिलाय.

 

इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या शिस्तपालन समितीने आजीवन बंदीची शिफारस केलीय. यामुळे ज्वाला गुट्टाला डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनमध्ये खेळायला बंदी घालण्यात आली होती. पण निर्णयाविरोधात ज्वाला गुट्टाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.

 

या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत ज्वाला गुट्टा खेळू शकते असा निकाल आज कोर्टाने दिला. त्यामुळे डेन्मार्क ओपन स्पर्धेत खेळण्याचा ज्वालाचा मार्ग मोकळा झालाय.

close