भीषण चक्रीवादळ ओडिशा-आंध्रच्या किनार्‍यावर धडकणार

October 11, 2013 3:27 PM0 commentsViews: 1095

odiash syaclon11 ऑक्टोबर : ओडिशा आणि आंध्रप्रदेशला फायलीन या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झालाय. ताशी 200 ते 250 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळपर्यंत किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा सामना करण्यासाठी या दोन्ही राज्यांमध्ये युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू आहे. लष्कर, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान दोन्ही राज्यांमध्ये बचावकार्यात गुंतलेत. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

ओडिशा आणि आंध्रप्रदेशला फायलीन या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झालाय. ताशी 200 ते 250 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळपर्यंत किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा सामना करण्यासाठी या दोन्ही राज्यांमध्ये युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू आहे.

चक्रीवादळ फायलीन ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या दिशेनं वेगानं सरकतंय. त्याचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येतेय. केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलंय.

विशेष बचाव आयुक्त प्रदीकुमार मोहपात्रा म्हणतात, अतितीव्र चक्रीवादळाचं आता सुपर सायक्लॉनमध्ये रुपांतर झालंय. वार्‍याचा वेग ताशी 260 किमी असल्याची माहिती आपल्याला मिळालीय. हवामान खात्याचा अंदाज ताशी 215 किमी आहे. 1999 प्रमाणेच स्थिती निर्माण येण्याची शक्यता आहे.

एक चांगली गोष्ट म्हणजे 1999च्या तुलनेत ओडिशा सरकारची यावेळची तयारी अधिक आहे. 1999 मधल्या सुपर सायक्लॉनच्या तडाख्यात 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून किनारी भागात 247 सायक्लॉन सेंटर्स उभारण्यात आलीयत. आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लोक आणि बचाव पथकं अधिक सक्षम झाली आहे.

किनारपट्टीतल्या 4 जिल्ह्यांतल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम शनिवारी सकाळपर्यंत पूर्ण होईल, असं प्रशासनानं सांगितलंय. शेजारच्या आंध्रप्रदेशातही पूर्वतयारी सुरू आहे. श्रीकाकुलम, विजयनगर आणि विशाखापट्टण या तीन जिल्ह्यांना जास्त धोका असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी विजयनगमध्ये संचारबंदीत पोलिसांनी 9 तासांची सूट दिली होती. स्वतंत्र तेलंगणाच्या विरोधात संपावर गेलेले सरकारी कर्मचारीही कामावर परतलेत.

शनिवारी संध्याकाळी फायलीन चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी 6,40,000 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची गरज आहे. या हजारो लोकांना अन्न, पाणी आणि इतर जीवनानश्यक वस्तू मिळाव्यात, याची खबरदारी घेण्याचं आव्हान प्रशासनापुढे आहे.

1999 : ओरिसाला सायक्लॉनचा तडाखा
– 10 हजार लोकांचा मृत्यू
– तेव्हापासून किनारी भागात 247 सायक्लॉन सेंटर्स उभारली
– चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लोक आणि बचाव पथकं अधिक सक्षम

चक्रीवादळ फायलीन

सध्याचं ठिकाण
– ओडिशाजवळच्या पॅरादीपपासून 400 किमी अंतरावर

चक्रीवादळाचा वेग
– ताशी 200 ते 250 किमी वेगानं किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता

चक्रीवादळ कधी येणार?
– शनिवारी संध्याकाळी

धोका असलेले जिल्हे
– ओडिशा
गंजम, खुर्दा, पुरी आणि जगतसिंगपूर

– आंध्र प्रदेश
– विशाखापट्टण, मछलीपट्टणम, निझामपट्टण, कृष्णपट्टणम, काकिनाडा, गंगावरम

फायलीन म्हणजे काय?

– फायलीन म्हणजे इंद्रनील नावाचे निळे रत्न
– या वादळामुळे आधी थायलंडमध्ये पाऊस पडला, म्हणून तिथल्या स्थानिक थाई भाषेतलं नाव ठेवलं
– थायलंडमध्ये18 किमी/तास या वेगाने फायलीनने प्रवास सुरू केला
– बंगालच्या उपसागरात उष्णतेमुळे मोठ्या चक्रीवादळात रूपांतर झालं

close