कसाबचे कस्टडीतले फोटो पहिल्यांदाच प्रसिध्द

February 3, 2009 5:17 PM0 commentsViews: 6

4 फेब्रुवारी, मुंबई मुंबई हल्ल्यातील पाक दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबच्या सुरक्षेबाबत अतिशय गुप्तता पाळली जातेय. पण या कसाबचे फोटो आता बाहेर आलेत. कसाब हा मुंबई पोलिसांसाठीच नाही तर भारतासाठी एक महत्वाचा आरोपी आहे. कारण त्याच्या अटकेमुळंच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं जगाला कळालं. पाक पुरस्कृत दहशतवादाचा क्रूर चेहरा यामुळं जगापुढं आला. या कसाबला पोलीस अतिशय जपताहेत..त्याला भेटण्याची परवानगी फक्त चार पोलीस अधिकार्‍यांना आहे. त्याला जेवणातून विषबाधा होऊ नये यासाठी दरदिवशी वेगवेगळ्या हॉटेलातून जेवण आणलं जातं. ते जेवण पहिल्यांदा एक पोलीस अधिकारी चाखतो. त्यानंतर ते कसाबला दिलं जातं. " मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब ने स्वत:बाबत सगळी माहिती पोलिसांना सांगितली आहे आणि त्याच्याकडून आणखी माहिती घेण्याचे प्रयत्न चालू आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

close