आव्हाडांना धक्का, ठाणे पालिका स्थायी समिती महायुतीकडे !

October 11, 2013 2:33 PM0 commentsViews: 1815

thane palika11 ऑक्टोबर : ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाडांना धक्का देत बाजी मारलीये. महायुतीने स्थायी समितीचं सभापतीपद राखलंय.

 

बसपचे विलास कांबळे यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. कांबळे यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून शिवसेनेसाठी हा विजय महत्वाचा मानला जातोय. महापालिकेत महापौरपद शिवसेनेकडे असलं तरी स्थायी समिती सभापतीपद सेनेकडे नव्हतं.

 

विलास कांबळे बसपचे नगरसेवक असले तरी शिवसेनेने त्यांना गेल्यावेळीच हे पद देण्याचा शब्द दिला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेने विलास कांबळे यांना स्थायी समिती सभापतीपदावर बिनविरोध निवडून आणलंय.

close