कॅन्सरच्या भीतीने 50 महिलांनी काढून टाकली गर्भाशयं

October 11, 2013 1:06 PM0 commentsViews: 709

11 ऑक्टोबर : औरंगाबादेतील पोखरा गावात केवळ गैरसमज आणि भीतीमुळे जवळपास 40 ते 50 महिलांनी आपलं गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. गर्भाशयात गाठ झाली असून यातून कॅन्सर बळावू शकतो अशी भीती या महिलांना होती. या महिलांनी डॉक्टरांकडे यावर गोळ्या औषधामुळे काही उपचार होऊ शकतो अशी विचारणा केली मात्र कॅन्सरसारख्या भयंकर आजाराच्या भीतीने या महिलांनी गर्भाशयं काढून टाकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या सर्व 50 महिलांची एकाच डॉक्टरने गर्भाशयं काढून टाकली. शिर्डी येथील डॉ. मधुकर देशमुख यांनी या महिलांची ऑपरेशन्स केली आहेत. मात्र याबद्दल देशमुख यांना विचारणा केली असता. त्यांनी महिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले. आमच्या हॉस्पिटलमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तशा प्रकारची कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही. आमच्याकडे सर्व ऑपरेशनचे रेकॉर्ड ठेवले जातात अशी बाजू देशमुख यांनी मांडली.

close