भारताचा श्रीलंकेवर 147 रन्सनी विजय – मॅचसह सीरिजही जिंकली

February 3, 2009 5:28 PM0 commentsViews: 3

3 फेब्रुवारी, कोलंबो कोलंबो वन डेत विजय मिळवत भारतानं वन डे सीरिज तर खिशात टाकलीये. पण त्याचबरोबर धोणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडीयानं सलग आठ विजय मिळवण्याचा पराक्रम केलाय. सलग आठ विजय मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही तर याअगोदरही तीन वेळा भारतानं आठ सलग विजय पटकोवले होते. 1985 साली कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग आठ विजय मिळवले होते. त्यानंतर 2003 आणि 2006 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं ही करामात केली होती. आणि आता महेंद्र सिंग धोणीच्या टीम इंडीयानं या इतिहासाची पुनरावृत्ती केलीये. त्यामुळे गुरुवारी कोलंबोत होणार्‍या चौथ्या वन डेत जर भारतीय टीमनं बाजी मारली तर धोणीची ही टीम इंडीया भारतासाठी सलग 9 विजयांचा एक नवीन रेकॉर्ड रचेल. तिसर्‍या वन-डेतही श्रीलंकेविरूद्ध 147 रन्सने विजय मिळवत भारताने जबरदस्त खेळ कायम ठेवलाय आणि सीरिजमध्ये 3-0 अशी आघाडी घेतलीय. बॅट्समनी 364ची दमदार खेळी केल्यानंतर भारतीय बॉलर्सनीही आपलं काम चोख बजावलं.भारतासाठी इनिंगची सुरुवात काही तितकीशी चांगली झाली नाही. सलग तिसर्‍यांदा चुकीच्या निर्णयामुळे सचिन तेंडुलकर लवकर आऊट झाला. गौतम गंभीरही चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण दुदैर्वीरित्या तोही आऊट झाला. मॅचवर श्रीलंकेने आपलं वर्चस्व ठेवलं असं वाटत असतानाच वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगने बॉलर्सवर हल्ला केला. युवराजने अवघ्या 82 बॉल्समध्ये वन-डेमधली 11वी सेंच्युरी ठोकली. दोन ओव्हरनंतर सेहवागनेही मस्त शॉर्टवर आपली 10वी वन-डे सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर मैदानात आलेल्या धोणी-युसूफ पठाण जोडीने रन्सचा धडाका सुरूच ठेवला. पठाणने तर खणखणीत शॉर्ट्स मारत नाबाद 59 रन्स केले आणि याच्याच जोरावर भारताने 364 रन्सचं मोठं आव्हान श्रीलंकेसमोर ठेवलं.रन्सचा डोंगर पार करण्यासाठी श्रीलंकेला जबरदस्त ओपनिंगची गरज होती. पण प्रविण कुमारने दुसर्‍याच ओव्हरमध्ये जयसूर्याला आऊट करत त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर लगेचच तिलकरत्ने दिलशान प्रविण कुमारचा दुसरा बळी ठरला. संगकारा आणि कॅप्टन जयवर्धनेने श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संगकाराने आपली 50वी हाफ सेंच्युरी ठोकली. पण त्यानंतर उरलेल्या श्रीलंकन बॅट्समनला मात्र जास्त काही करता आलं नाही. आणि भारताने वन-डेमध्ये लागोपाठ 8वा विजय मिळवत सीरिज आपल्या खिशात टाकली.

close