सर्वांचा आभारी

October 11, 2013 6:40 PM0 commentsViews: 253

11 ऑक्टोबर : महानायक अमिताभ बच्चनचा आज वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल बिग बींनी त्यांचे मनापासूनर आभार मानले. गेले 45 वर्षं अमिताभ आणि चाहते यांचं खास समीकरण जुळलंय. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमिताभनं आपल्या चाहत्यांना एक लखलखतं गिफ्ट देण्याचं जाहीर केलं. हरिवंशराय बच्चन ट्रस्टच्या वतीनं 3000 घरांमध्ये वीज पुरवणार असल्याची माहिती अमिताभनं दिलीये.

close