शालेय आहार घोटाळा : प्रवीण ट्रेटर्सच्या कार्यालयावर छापा

October 11, 2013 9:01 PM1 commentViews: 289

11 ऑक्टोबर : परभणीतल्या शालेय पोषण आहार घोटाळ्याला आता वेगळं वळण मिळालंय. गुरूवारी पोलिसांनी प्रवीण ट्रेडर्सच्या जालना इथल्या ऑफिसवर छापा टाकला. यात जिंतूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकार्‍यांसह जिंतूर, परभणी, पूर्णा, मानवत इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांचे शिक्के आणि डायर्‍या जप्त केल्यात. त्यामुळे आता पोलीस जिंतूरच्या गट शिक्षणाधिकार्‍यांसह अनेकांची चौकशी करणार आहेत. दरम्यान, या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रवीण ट्रेडर्सचा मालक राजेंद्र जेठलिया अजूनही फरार आहे. मागिल आठवड्यात विद्यार्थ्यांना देण्यात येणार शालेय पोषण आहाराचं धान्य राजेंद्र जेठलिया बाजारात विकत असल्याच उघड झालं होतं पोलिसांनी ट्रेडर्सवर छापा टाकून तीन ट्रक ताब्यात घेतले होते. तेंव्हापासून राजेंद्र जेठलिया फरार झालाय.

  • Ranjeet Karegaonkar

    आणि जेव्हा कुपनच पिक खाते.?

close