मिहान प्रकल्पाचं काम बीओटी तत्वावर -मुख्यमंत्री

October 11, 2013 8:12 PM0 commentsViews: 250

11 ऑक्टोबर : मिहान प्रकल्पासाठी जागेचे अधिग्रहण झाल्यावर विमानतळाचं आणि प्रकल्पाचं बीओटी तत्वावर काम सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. CII नं विदर्भातल्या उद्योगपतींच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते. नविन औद्योगिक धोरण आणि नविन वस्त्रद्योग धोरणासोबतच उद्योगाला लागणार्‍या विजेच्या दरासाठी विचार सुरू असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भाच्या अनुशेषासंदर्भात नेमण्यात आलेल्या विजय केळकर समितीचा अहवाल लवकरच येणार आहे. या अहवालानंतर अनुषेशासंदर्भात ठोस काहीतरी करता येईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

close