सुनील गावसकर यांना डॉक्टरेट प्रदान

February 4, 2009 8:49 AM0 commentsViews: 4

4 फेब्रुवारी, मुंबईभारताचे ज्येष्ठ बॅट्समन सुनील गावसकर यांना आज डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभा दरम्यान गावसकर यांचा खास गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल एस सी जमीर यांच्या हस्ते गावसकरांना सन्माननीय पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रंगमूलम् ही उपस्थित होते. डी. वाय. पाटिल विद्यापीठाच्या नवी मुंबईतल्या क्रिकेट स्टेडिअमवर हा समारंभ आज पार पडला.गावसकर यांना यापूर्वी, आंध्र विद्यापीठ तसंच इंदूर विद्यापीठानेही डॉक्टरेट प्रदान केली आहे. गावसकर सध्या भारत आणि श्रीलंके दरम्यान सुरु असलेल्या वन डे सीरिजच्या कॉमेंट्रीसाठी श्रीलंकेत होते. पण या कार्यक्रमासाठी आज सकाळी ते मुंबईत आले. डॉक्टरेट सन्मानाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला

close