फायलीन चक्रीवादळाची वेगाने ओडिशाकडे कूच

October 12, 2013 3:00 PM0 commentsViews: 1882

Odisha_Cyclone12 ऑक्टोबर : ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या दिशेनं फायलीन हे चक्रीवादळ अतिशय वेगानं पुढं सरकतंय. ताशी 200 ते 240 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

 

ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्या कॅटरिना या चक्रीवादळा इतकंच भयंकर हे वादळ असणार आहे. ओडीशातल्या गंजाम जिल्ह्यातल्या गोपालपूर इथं हे वादळ धडकणार आहे. ओडिशातल्या पॅरादीप आणि आंध्रातल्या कलिंगा-पटनम या पट्‌ट्यात या चक्रीवादळाचा जोर असणार आहे.

 

सध्या हे चक्रीवादळ ओडीशाच्या किनारपट्टीपासून 300 किमी अंतरावर आहे. वादळ थडकण्यापूर्वीच ओडीशात जोरदार पावसाला सुरूवात झालीय. त्यामुळे भुवनेश्वरमधून सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. 1999 साली ओडिशात आलेल्या अशाच प्रकारच्या वादळानं जवळपास 10 हजार जणांचा बळी घेतला होता.

 

आता या वादळाचा सामना करण्यासाठी या दोन्ही राज्यांमध्ये युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू आहे. ओडिशात आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. लष्कर, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

close