उद्धव ठाकरेंवर टीका नाही,जोशींचा घूमजाव

October 12, 2013 3:14 PM0 commentsViews: 962

manohar joshi12 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून खळबळ उडवून दिली. पण आज त्यांनी घूमजाव करत उद्धव यांच्याबद्दल एक शब्दही बोललो नसल्याचा दावा केलाय.

 

स्मारक न व्हायला नेतृत्त्वच कारणीभूत आहे, असा आरोप काल मनोहर जोशींनी केला होता. जर बाळासाहेब हयात असते आणि प्रबोधनकारांच्या स्मारकाचा मुद्दा असता तर बाळासाहेबांनी हे सरकार पाडलं असतं.

 

वर्षभरात स्मारक होत नाही याबद्दल शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पण आंदोलनाचा अधिकार उद्धव ठाकरेंचा असल्याचं मनोहर जोशी यांनी म्हटलंय. पण आज मात्र त्यांनी असं काही बोललं नसल्याचं सांगितलं.

close