सीमारेषेवर कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

October 12, 2013 8:47 PM0 commentsViews: 1621

12 ऑक्टोबर : भारत-पाकिस्तान सीमेवर गुरुवारी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. शहीद जवान कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या मासा बेलेवाडी येथील राहणार होते. सातप्पा पाटील असं या शहीद जवानाचं नाव असून मराठा लाईट इन्फन्ट्रीचा हा जवान आहे. शहीद सातप्पा पाटीलचं पार्थिव उद्या त्याच्या गावी आणण्यात येणार आहे. काश्मिरमधील केरन भागात गेल्या काही दिवसांपासून घुसखोरांनी डोकं वर काढलंय. गेल्या महिन्याभरात केरन भागात घुसखोरीच्या अनेक घटना घडल्यात. दहशतवाद्यांना हाकलून लावण्यासाठी भारतीय सैन्यांनं मोहिम सुरू केलीय. या मोहिमेत आतापर्यंत 18 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. मात्र दहशदवाद्यांची घुसखोरी सुरूच आहे. मात्र पाकने नेहमी प्रमाणे घुसखोरीचा आरोप फेटाळून लावलाय.

close