अखेर फायलीन चक्रीवादळ धडकलं

October 12, 2013 9:05 PM0 commentsViews: 1931

12 ऑक्टोबर : या वर्षातलं सर्वात मोठं चक्रीवादळ अखेर ओडिशाच्या किनार्‍यावर धडकलंय. 200 ते 240 किलोमीटर वेगानं आलेल्या या चक्रीवादळाने किनार्‍यावर तांडव सुरू केलंय. ओडिशाच्या गोपाळपूरच्या किनार्‍यावर 9.15 च्या सुमारास हे चक्रीवादळ धडकलं असून संपूर्ण ओडिशात जोरदार पाऊस सुरू आहे.

Cyclon-jpg

या चक्रीवादळाचा तडाखा हा सहा तास बसणार आहे. या सहा तासात तिथे काय घडेल याबद्दल कोणतीही कल्पना करणं अशक्य आहे. या चक्रीवादळाचा तीव्रता मध्यरात्री तीन वाजेपर्यंत असणार असून त्यानंतर जोर ओसरणार्‍याची शक्यता भारतीय हवामान खात्याचे संचालक डॉ.एल.एस राठोड यांनी व्यक्त केली.

 

 

तसंच या वादळामुळे या पुढील 24 तास ओडिशात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळणार असून वार्‍याचा वेग हा 210 कि.मी.प्रति तास इतका राहणार आहे. या काळात कोणतेही बचावकार्य करता येणार नाही. उद्या दुपारी दोन वाजेनंतर संपर्ण घटनेचा आढावा घेतला जाईल त्यानंतर पुढील कार्याला सुरूवात केली जाईल अशी माहिती राठोड यांनी दिली. खबरदारी म्हणून अगोदरच साडे चार लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. मात्र या वादळामुळे दूरसंचार सेवा, वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. रस्ते,रेल्वे आणि हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. या चक्रीवादळाच्या धडकण्याच्या अगोदर ओडिशाच्या किनार्‍यावर तुफानी पाऊस झाला यात झाडं कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय.

 

पुढील सहा तासही वादळाची असून यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल त्यानंतर काय पाऊल उचलायचंय हे निश्चित कळेल असंही राठोड यांनी स्पष्ट केलं. या वादळाचा सामना करण्यासाठी या ओडिशा आणि आंध्र या दोन्ही राज्यांमध्ये युद्धपातळीवर पूर्वतयारी झालीय. ओडिशातून आतापर्यंत जवळपास साडेचार लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. लष्कर, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. NDRF च्या 26 टीम ओडिशात आणि 15 टीम आंध्र मध्ये तैनात आहेत. दोन्ही राज्यांमध्ये आर्मी इंजिनिअरींग टास्कची एक टीमसुद्धा दाखल झालीय.

close