फायलीन चक्रीवादळाचे 7 बळी

October 13, 2013 3:22 PM0 commentsViews: 262

philin4413 ऑक्टोबर : फायलीन चक्रीवादळाचा जोर आता ओसरला असला, तरी ओडिशा आणि आंध्र प्रदेशात त्याचे परिणाम मात्र दिसत आहेत. चक्रीवादळामुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

ओडिशामधल्या गंजम जिल्ह्याला या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसल्याचं ओडिशा सरकारनं सांगितलं. गंजममधल्या गोपालपूरमध्येच सर्वात आधी फायलीन चक्रीवादळ धडकलं. ओडिशामधल्या 12 जिल्ह्यामध्ये तब्बल 80 लाख लोकांना वादळाचा फटका बसल्याचं सांगण्यात येतंय.

 

ओडिशा आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये पुढचे 24 ते 38 तास पाऊस सुरु राहील असं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय. त्याचा फटका बिहारला बसू शकतो. बिहारमधल्या कोस आणि गंधक नद्यांना पूर येण्याचा धोका आहे. दरम्यान, हवामान खात्यानं आंध्र प्रदेशाला चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा मागे घेतलाय.

close