सेनेकडून स्मारक होत नसेल तर आम्ही करू-नितेश राणे

October 13, 2013 3:34 PM0 commentsViews: 2634

Image img_177442_niteshraneq_240x180.jpg13 ऑक्टोबर : शिवसेनेत ‘संरा’च्या विधानामुळे आलेल्या वादळात आता स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी उडी घेतलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवसेनेला करता येत नसेल तर ते आम्ही करु, कारण बाळासाहेब हे फक्त शिवसेनेचे नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचे, देशाचे होते अशी खरमरती टीका नितेश राणे यांनी केली.

 

तसंच मनोहर जोशी यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. शिवाजी पार्कच्या जागेसाठी न भांडता मनोहर जोशींनी आपल्याला बाळासाहेबांनी दिलेल्या अनेक पदांच्या बदल्यात आपली कोहिनूर मिलची जागा द्यावी असा टोला राणे यांनी लगावला.

 

नितेश राणे एवढ्यावर थांबले नाही ते म्हणतात, उद्धव ठाकरेंनी संजय राऊत सारख्यांना वेळीच आवरावे नाहीतर पक्षात फक्त उद्धव आणि त्यांचा मुलगाच उरेल. शिवसेना आता उद्धव ठाकरे चालवत नसून आदेश बांदेकर, संजय राऊत, मिलिंद नार्वेकरांसारखे नेते चालवत असून त्यांची कुठलीही निवडणूक जिंकण्याची कुवत नसल्याचं परखड मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं. तर दसरा मेळाव्याला या वर्षी धमक्या देऊन माणसे गोळा केली जात असल्याचा सणसणीत आरोप राणे यांनी केला.

close