मनोहर जोशींना विशेष सुरक्षा

October 13, 2013 2:53 PM0 commentsViews: 1025

manohar joshi13 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यामुळे मनोहर जोशी वादात सापडले आहे. त्यांच्या विधानामुळे कोणताही शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. याची खबरदारी घेत जोशींना विशेष सुरक्षा देण्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये.

 

मनोहर जोशींनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झालेत. या सर्व घडामोडींमध्ये मनोहर जोशी दसरा मेळाव्याला हजर राहण्याबाबतही साशंकता आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

दोन दिवसांपूर्वी मनोहर जोशी यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन शिवसैनिकांत संताप आहे. जोशींनी केलेल्या विधानानंतर आज ते दसरा मेळाव्यात सामील होणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे, ते दसरा मेळाव्यात व्यासपीठावर बसल्यास किंवा भाषणाला उभे राहिल्यास शिवसैनिक आक्रमक होतील आणि घोषणाबाजी करतील अशी शक्यता आहे. मात्र शिवसेनेतर्फे मनोहर जोशी सभेत सहभागी होतील अस सांगण्यात आलंय. पोलिसांना सभेच्या ठिकाणी सतर्क झाल्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

close