मध्यप्रदेशात चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 89 वर

October 13, 2013 7:08 PM0 commentsViews: 568

mp story13 ऑक्टोबर : मध्यप्रदेशातल्या दातिया जिल्ह्यात रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 89 वर पोहचला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मृतांमध्ये 17 मुलं, 31 महिला , 41 पुरुषांचा समावेश आहे.
.मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. भाविक मंदिराकडे जात असताना सिंध नदीवरच्या पुलावर ही चेंगराचेंगरी झाली. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाल्याचं कळतंय. त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त होतेय.

 

पण पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा लाठीमार केला नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितलंय. त्यामुळे या दुर्घटनेचं मूळ कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलं नाहीये. तर प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार काही तरूणांनी सिंध नदीवरचा पुल तुटला अशी अफवा पसरवली होती त्यामुळे लोक माघारी पळत सुटले आणि चेंगराचेंगरी घाली. दरम्यान, या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेत.

close