आवाज कुणाचा..!

October 13, 2013 5:24 PM0 commentsViews: 1892

विनोद तळेकर, मुंबई
13 ऑक्टोबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सर्वात मोठं आकर्षण काय असायचं तर ते म्हणजे बाळासाहेबांचं भाषण..खरंतर बाळासाहेब हे कोणत्याही व्यासपीठावर असोत, त्यांचं भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी मेजवानी होती. असं काय होतं बाळासाहेबांच्या भाषणात ज्या बळावर त्यांनी अवघा महाराष्ट्र मंत्रमुग्ध केला. याचाच घेतलेला हा आढावा…

 

 

त्यांची साद ऐकू आली की अवघा श्रोतावर्ग स्तब्ध व्हायचा..त्या स्तब्धतेमागे असायची एक उत्सुकता.आज कुणावर ही वीज कोसळणार याची उत्सुकता आणि मग पुढचे तास दोन तास म्हणजे हशा, टाळ्या आणि शिट्‌ट्या.. बाळासाहेबांच्या भाषणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अफलातून किस्से..कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते कुणावरही बरसायचे. कुणाचाही उल्लेख करताना त्यांनी वापरलेल्या विशेषणांचा एक स्वतंत्र शब्दकोश होईल.
राजकारण हा त्यांच्या आवडीचा विषय..त्यामुळे तो त्यांच्या भाषणात असायचाच, पण संगीत असो, खेळ असो, सिनेमा असो किंवा एखादी सामाजिक घटना असो. प्रत्येक संदर्भ अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी येणं ही त्यांच्या भाषणाची खरी ताकद. शिवसैनिकांसाठी त्यांचा शब्द म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा तर पार पडेल पण त्यात नसेल तो बाळासाहेबांचा शब्दरुपी प्राण..

close