मेळाव्यासाठी तयारी पूर्ण

October 13, 2013 5:35 PM0 commentsViews: 208

13 ऑक्टोबर : दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी होणारा शिवसेनेचा मेळावा यंदा पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत होतोय. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज शिवसेनेच्या या मेळाव्याला किनार आहे ती पक्षांर्गत संघर्षाची. ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्यानं शिवसेनेत खळबळ उडाली. काल अनेक सेना नेत्यांनी जोशींनी केलेल्या टीकेचा निषेध व्यक्त केला. जोशी यांनीही कालच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आपण उद्धव यांच्यावर टीका केली नसल्याची सारवासारव जोशी यांनी केली. मात्र आजच्या मेळाव्यात उद्धव या सगळ्या प्रकाराबद्दल खडे बोल सुनावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीयं. आता उद्धव यांच्या नेतृत्वावर शिवसेनेतूनच जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आता उद्धव नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close