एकमेकांची टाळकी फोडण्यासाठी पक्ष काढला नाही-राज ठाकरे

October 13, 2013 5:05 PM0 commentsViews: 3951

13 ऑक्टोबर : महाराष्ट्रकडे वाकड्या नजरेनं पाहणार्‍यांना ठोकून काढण्यासाठी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे. आपआपसात मराठी माणसांची टाळकी फोडण्यासाठी काढलेला पक्ष नाही असे शाब्दिक चिमटे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना काढले. तसंच यावेळी राज माध्यमांवरही घसरले मी माध्यमांसाठी बोलायला आलो नाही. मी फक्त महाराष्ट्रासाठी बोलतो असा वेगळा सूर राज यांनी लगावला. नरे पार्क जर नागरीकांना हवा असेल तर हा पार्क होणाराच असं राज यांनी ठणकावून सांगितलं. मुंबईतल्या परळ भागात नरे पार्क क्रीडा संकुलाचं राज यांच्या हस्ते उद्घाटन झालं.यावेळी ते बोलत होते. नरे पार्कला शिवसेनेनं कडाडून विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून मनसेनं नरे पार्कचं मोठ्या थाटात राज यांच्या हस्ते भूमीपूजन केलं.

close