पवार म्हणजे थकलेला नवरा, सगळीकडे बाशिंग -उद्धव ठाकरे

October 13, 2013 7:49 PM1 commentViews: 9505

udhabv thakare on joshi13 ऑक्टोबर : शरद पवार म्हणजे थकलेला नवरा, सगळीकडे बाशिंग त्यांना क्रिकेटची काळजी असून शेतकर्‍यांबाबत काहीही घेणं देणं नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली.

 

शरद पवार मुस्लीमांची बाजू घेऊन इशरत जहाँ निष्पाप असल्याचं म्हणतात मग त्यांना साध्वी प्रज्ञासिंग दिसत नाही का? मतांसाठी इतकी लाचारी का? असा खडासवालही उद्धव यांनी उपस्थित केला. शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या संख्येत पार पडला.

 

यावेळी उद्धव यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंतप्रधान, राहुल गांधी, काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. मात्र या मेळाव्याला गालबोट लागलं. सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी व्यासपीठावर पोहचल्यानंतर शिवसैनिकांनी ‘मनोहर जोशी हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली. या घोषणेबाजीमुळे अस्वस्थ होऊन मनोहर जोशींनी व्यासपीठावरून खाली उतरले आणि घरी निघून गेले. बाळासाहेबांच्या स्मारकांच्या मुद्यावर जोशींनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. उद्धव यांनी सरांच्या विधानाला उत्तर न देता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत जोशींना घरचा रस्ता दाखवला.पण, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय मात्र त्यांनी सोयीस्कररित्या टाळला.
उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका
सिंचनात 70 हजार कोटींचा घोटाळा झाला. हे 70 हजार कोटी गेले कुठे? पवार म्हणतात आरोप करणं ही फॅशन झालीय. मग आपल्या पुतण्यावर आरोप झाले होते तर त्यांची न्यायालयीन चौकशी का केली नाही.जे खरं आहे ते बाहेर आलं असतं. मात्र शरद पवारांनी तसं केलं नाही. त्यात पवारांनी मोदींवर टीका केली. पवार म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी टीका केली होती. पण निवडणुकांच्या तोंडावर पवारांची टीका म्हणजे हे असं आहे पवार थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग. खांद्या बाशिंग, गुडघ्याला बाशिंग काय काय कुठे नाही. आज एमसीएमध्ये बाशिंग बांधून उभे आहे. पण पवार केंद्रात बसलेले आहे पण पवारांनी महाराष्ट्रासाठी आजपर्यंत काय केलं? असा सवालही पवारांनी केला.
शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नाही
जोपर्यंत शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी पक्षप्रमुख म्हणून राहिलं. ज्यावेळेस तुमचा माझ्यावर विश्वास राहणार नाही. तेव्हा मी स्वत:हून पक्षप्रमुखपदावरून खाली उतरेन. मी शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नाही. शिवसैनिकासमोर मी नतमस्त आहे. त्यांचा निर्णय हाच माझा निर्णय आहे. आणि हीच आपली परंपरा आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी जोशींच्या विधानवर बोलण्याच टाळलं.
शिवसेना नरेंद्र मोदींच्या पाठिशी

राजनाथ सिंह यांनी फोन करून सांगितलं आम्ही नरेंद्र मोदींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी घोषणा करत आहे. मी म्हटलं, शिवसेना पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे असं पुन्हा एकदा उद्धव यांनी स्पष्ट केलं.

=========================================================

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र

=========================================================

– सीमारेषेवर पाकिस्तानी, चिनी घुसखोरी करत आहे, महागाई वाढत आहे याला नेंभळट सरकार जबाबदार
– श्रद्धावर घाला घालणार असाल तर वटहूकूम फाडून फेका
– वारकर्‍यांच्या संमतीशिवाय शिवसेना जादुटोणा विरोधी कायद्याला पाठिंबा देणार नाही
– काँग्रेस करतंय मुस्लिमांचं लांगूलचालन
– पंतप्रधान तुम्ही देशाचे पंतप्रधान आहे, मुस्लीमांचे नाही
– दाभोळकरांच्या हत्येचा तपास का नाही लागला, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
– शेतकर्‍यांच्या आत्महत्येला सरकारचं जबाबदार
– हे सरकार मोबाईलच्या प्रिपेड कार्ड सारखं चालतंय
– भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करा
– आम्ही मुस्लिम विरोधी नाही – उध्दव
– आघाडी आणि युतीच्या कामाची तुलना करा
– शिवसेनेंच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे नाहीत गुन्हे आहेत ते आंदोलनाचे
– सरकारमध्ये कुणाचा पायपूस कोणामध्ये नाही
– शरद पवारांना क्रिकेटची काळजी, शेतकर्‍यांनी नाही
– पवार म्हणजे थकलेला नवरा, सगळीकडे बाशिंग
– शिवसेनेवरचा घराणेशाहीचा आरोप चुकीचा
– ज्या दिवशी तुमचा विश्वास नसेल त्या दिवशी मी पक्ष प्रमुख राहणार नाही

 

  • Narendra Gosavi

    Nikhil sir Thakre aaj mhanat aahet ” Jadu tona bil “vathukum jar Hindun Virodhi asel tar fadun taku,mhnaje je swatala hindun che nete samjtat tyanach ajun bil samjal nahi aahe….Kas honar ya maharashtrach…Dabholkaranch swapan kadhi purn honar…

    plz tumhi ya mudyavar naki charcha ghadun aanli pahije,nahi he lok punha ekda bil dhudkaun lavtil.

close