शिवसैनिकांनी दाखवला सरांना घरचा रस्ता

October 13, 2013 9:41 PM4 commentsViews: 3760

manhoar joshi walkout13 ऑक्टोबर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यामुळे आज त्याचे तीव्र पडसाद दसरा मेळाव्यात उमटले. व्यासपीठावर मनोहर जोशी पोहचल्यानंतर शिवसैनिकांना ‘मनोहर जोशी हाय हाय, मनोहर जोशी खाली उतरा’ अशी घोषणाबाजी करून एकच गोंधळ उडवून दिला.

 

मनोहर जोशी काही काळ व्यासपीठावर बसले. मात्र शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. उद्धव ठाकरे, सेनेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र घोषणाबाजी सुरूच राहिल्या अखेर जोशींनी व्यासपीठावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. जोशी व्यासपीठावरून उतरून घरी निघून गेले.

 

मात्र माझा कुणावरही राग नाही, मी एक शिवसैनिक असून शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरे माझ्यावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी बसून जोशी सरांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. मात्र आजच्या मेळाव्यातून जोशींना व्यासपीठावरून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली.

 • Vinod Badhe

  जे झाले ते अयोग्य झाले !!! :)

 • Ashok Patil

  every body should know where to stop, and man like Manohar Joshi, even though he is Called after name as “Sir” – then how he was acted like this.

 • pravin kadam

  they way exit had happen with Manohar Joshi should not be happen with any other political leader….

 • suresh charde

  पेशवाईचे बंड शमले
  मनोहर जोशीने बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा
  उपस्थित करून शिवसैनिकांच्या मनातून उद्धव ठाकरे यांना उतरवण्याचा तो एक
  फंडा होता. साश्रु नयनांनी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या अस्थी वेचत असतानाच
  शिवाजी पार्कातच बाळासाहेबांचे स्मारक उभे राहायला हवे, अशी बांग या
  कुडमुड्याजोशीने दिली. शिवसैनिकांच्या मनातून उतवण्यासाठीच हा डाव होता, हे
  आता उघड झाले आहे. दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठीच उद्धव ठाकरेंची
  भेट घेतली. परंतु लेखी माफीनामा देऊन तो वृत्तपत्रांना देण्यास मात्र नकार
  दिला. इतरांनी दसरा मेळाव्यात जाणे योग्य होणार नसल्याचे सांगितल्यावरही
  शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा पेशवा तिथे गेला. येथे जर
  शिवसैनिकांनी जोशीला समर्थन दिले असते तर महाराष्टÑात दुसरी पेशवाई सुरू
  झाली असती.

close