MCAच्या निवडणुकीत पवारांचा पाठीमागून वार-मुंडे

October 13, 2013 8:45 PM0 commentsViews: 1379

Image img_237622_gopinathmunde34_240x180.jpg13 ऑक्टोबर : मी एमसीए मध्ये आलो तर; पवारांच्या सर्व भानगडी बाहेर निघतील, अशी भिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतेय. म्हणूनच त्यांनी माझा अर्ज बाद केलाय. या निवडणुकीत त्यांनी पाठीमागून वार केलाय. असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

 

दसरा मेळावा साजरा करण्यासाठी मुंडे नगर जिल्हयातल्या पाथर्डीमधल्या श्री क्षेत्र भगवानगडावर आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार, जित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली.

 

हे तीन्ही एकत्र येऊन आपल्याला संपवायला निघालेत. पण मला गाडणारा जन्माला यायचा आहे अशा शब्दात मुंडेंनी टीका केलीय. मुंबईत कायस्वरूपी वास्तव्य नसल्याचं कारण देत एमसीएने मुंडेंचा अर्ज अवैध ठरवला आहे.

close