गडचिरोलीतल्या शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

February 4, 2009 5:01 PM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीगडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारनं केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय गडचिरोलीत विमानतळ उभारण्यासाठी 300 हेक्टर जागा घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच अमरावती जिल्ह्यातल्या बेलोर विमानतळाच्या विस्तारीकरणाचाही निर्णय झाला असून त्यासाठी 279 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

close