पवारांवर टीका करताना नीट विचार करा -अजित पवार

October 14, 2013 3:12 PM1 commentViews: 2852

Image ajitdada_on_cm3463_300x255.jpg14 ऑक्टोबर : शरद पवार आणि बाळासाहेबांचे राजकारणापलीकडे चांगले संबंध होते. याचा विचार उद्धव ठाकरेंनी आरोप करताना करावा, असा सल्ला वजा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

 

तसंच जाहीर सभेत आम्हीही आरोप करू शकतो, असंही ते म्हणालेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारच्या दसरा मेळाव्यात शरद पवार यांच्यावर तोफ डागली होती. शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली होती.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळावा मोठ्या संख्येनं पार पडला. या मेळाव्याला पक्षाअंतर्गत राजकारणाची झालर होती. आणि याची झलकही मेळाव्याच्या सुरूवातील काही मिनिटातच पाहण्यास मिळाली. पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे जोशी सरांना व्यासपीठ सोडावे लागले. या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चौफेर तोफ डागलीय. यात त्यांनी हल्लाबोल केला राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर.

 

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर होण्याअगोदर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी टीका पवारांनी मोदींवर केली होती. निवडणुकांच्या तोंडावर पवारांची टीका आणि शब्दांची धार योग्य होती. पण जर पवारांच्या बाबतीत अशी टीका करायची ठरली तर पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग. खांद्याला बाशिंग, गुडघ्याला बाशिंग काय काय कुठे नाही. आज एमसीएमध्ये बाशिंग बांधून उभे आहे अशी खरमरती टीका उद्धव यांनी केली होती.

 

उद्धव यांच्या टीकेला आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिलं. त्यांनी काय विधान करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्याही सभेतून प्रतिउत्तर देऊ शकतो पण काय आहे की, निवडणुकाजवळ आल्यावर अशा टीका काहीजण करत असतात. काहीजण निवडणुका लक्षात घेऊन टीका करतात वास्तविक उद्धव यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे कसे संबंध होते याचा विचार करावा. त्यांचं मित्रत्वाचं नातं होतं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे नाते दोघांही शेवटपर्यंत जपलं याचा विचार करून उद्धव यांनी टीका करावी असं प्रतिउत्तर अजित पवार यांनी दिलं.

  • ऋषिकेश काळे पाटील

    दूसरे येतेच काय….??

close