प्रेमविवाह केला म्हणून तरूणीचं केलं मुंडन

October 14, 2013 2:18 PM1 commentViews: 904

thane mundan news14 ऑक्टोबर : आदिवासी समाजातल्या तरूणीने आपल्या मुलाशी विवाह केला म्हणून तरूणाच्या आईवडिलांनी तिचं मुंडन केल्याचा अमानुष प्रकार घडलाय. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या मेंदे गावात हा प्रकार घडलाय.

 

कुणबी समाजातल्या योगेश पाटील यानं कातकरी समाजातल्या दर्शना नावाच्या तरूणीशी मे महिन्यात प्रेमविवाह केला. पण आपल्या मुलानं आदिवासी समाजातल्या मुलीशी लग्न केल्याचं योगेशची आई मालती पाटील आणि वडिल मधूकर पाटील यांना आवडलं नाही.

 

घरचा विरोध असल्याने योगेश आपल्या सासरी पालीला राहायला गेला. योगेशच्या आईवडलांनी पालीला जाऊन योगेशला मारहाण केली आणि त्याला बळजबरीनं आपल्या घरी घेऊन आले. त्यानंतर दर्शनानं मेंद्याला जाऊन योगेशची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

 

त्यानंतर दोघेही पालीला जायला निघाले असताना योगेशच्या आईवडिलांनी त्यांना घराच्या पायरीच्या लाकडाला बांधून ठेवलं. दर्शनाला शिवीगाळ करून तिचे कोयत्यानं केस कापून तिचं मुंडण केलं आणि दोघांनाही मारहाण केली. याप्रकरणी ठाणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Sandesh Bhagat

    he murkha lok jatipatichya baher kadhi yenar ahet ki nahi? murdad sale

close