फायलीन वादळानंतर ओडिशात पावसाचं धूमशान

October 14, 2013 2:27 PM0 commentsViews: 280

odisha news14 ऑक्टोबर : फायलीन चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर आता पश्चिम आणि उत्तर ओडिशामध्ये मुसळधार पावसानं तडाखा दिला. ओडिशामध्ये बालेश्वर, मयूरभंज, भद्रक आणि जजपूर या जिल्ह्यांमधल्या तीन नद्यांना पूर आलाय.

 

चक्रीवादळामुळे आतापर्यंत 21 जणांचा बळी गेलाय. खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल 9 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी टळली. तब्बल 5 लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय. आणि एक कोटी लोकांना वादळाचा तडाखा बसलाय.

 

पण सुमारे 6 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे जीवितहानी कमी झालीये. आता लोकांचं पुनर्वसन हे प्रशासनासमोरचं प्रमुख आवाहन आहे. पूरग्रस्तांना आता हवाई मार्गाने अन्नाची पाकिटं पुरवली जातील.

close