नाशिक महापौर-आयुक्तांची मालमत्ता जप्त करा:हायकोर्ट

October 14, 2013 6:20 PM0 commentsViews: 1308

high coart on palika14 ऑक्टोबर : मंजूर झालेल्या रस्त्याचं काम न केल्यामुळे नाशिक महापालिकेचे आयुक्त आणि महापौर यांच्या मालमत्तेचा जप्ती वॉरंट काढण्यात आलंय.

 

राजेश रॉय यांचं सातपूरमध्ये शितल नावाचं थिएटर होतं. तिथपर्यंतच्या रस्त्याला विकास आराखड्यात मंजुरी देण्यात आली होती. पण गेल्या 20 वर्षांपासून हा रस्ता बांधण्यात महापालिका प्रशासन चालढकल करत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

 

त्यांच्या विरोधात महापालिकेनं हायकोर्टातही धाव घेतली होती. पण निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजुनं लागलाय. त्यानुसार आज ते कोर्टाचे बेलीफ घेऊनच महापालिकेत दाखल झाले.

close