शिवसेनेला कंटाळून चौगुले,घाडी मनसेत दाखल

October 14, 2013 6:00 PM0 commentsViews: 2416

sanjay ghadi14 ऑक्टोबर : शिवसेनेचे उपनेते राजा चौगुले, संजय घाडी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका संजना घाडी, माजी नगरसेवक आणि नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी शेकडो कार्यकत्यांर्सह आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

 

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चौगुले, घाडी यांनी प्रवेश केला. राज यांच्या निवासस्थानाबाहेर या नेत्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात पक्ष प्रवेशाचं स्वागत केलं.

 

प्रवेश केल्यानंतर राजा चौगुले आणि संजय घाडी यांनी शिवसेनेवरचा राग व्यक्त केला. गेली चार वर्ष आम्ही शिवसेनेत होतो. शिवसेनेत मला उपनेतेपद देण्यात आलं होतं. पण राजकारणात कसा वापर करून घ्यायचा, नंतर कसं वार्‍यावर सोडायचं याचा अनुभव सेनेत आला अशी प्रतिक्रिया संजय घाडी यांनी दिली. तर शिवसेनेत भ्रमनिरास झाला. वापरा आणि सोडा अशी पद्धत सेनेत आहे त्यामुळे खूप मनस्ताप झाला अशी टीका राज चौगुले यांनी केली.

close