मध्य प्रदेश:चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 115 वर

October 14, 2013 7:23 PM0 commentsViews: 1996

14 ऑक्टोबर : मध्यप्रदेशात दातिया जिल्ह्यातल्या रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांचा आकडा 115वर पोचलाय. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. तर शंभरहून जास्त जणं जखमी झालेत. सिंध नदीच्या पुलावर ही चेंगराचेंगरी झाली. पूल कोसळत असल्याची अफवा उडाल्यानं चेंगराचेंगरी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पण, पोलिसांनी लाठीमार केल्यानं ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदशीर्चं म्हणणंय. चेंगराचेंगरीनंतर पोलीस आणि भाविकांमध्ये चकमक झाल्याचंही समजतंय. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाले. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखरुपयांची मदत जाहीर केलीय.

close