पाकिस्तानकडून भारताच्या एकतेला धोका- सोनिया गांधी

February 4, 2009 3:55 PM0 commentsViews: 4

4 फेब्रुवारी दमणदहशतवादाच्या मुद्यावर काँग्रेस सोनिया गांधी यांनी पाकिस्तानवर कडाडून हल्ला चढवला. शेजारचे देश भारतातल्या जातीय सलोख्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. सिल्वासामधल्या सभेत त्या बोलत होत्या. दमणमध्ये नव्यानं बांधलेल्या राजीव गांधी पुलाचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं. या सभेत दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

close