MCA निवडणुकीबाबत मुंडेंचं अपील दाखल

October 15, 2013 2:18 PM0 commentsViews: 691

munde on mca copy15 ऑक्टोबर : एमसीएच्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज अवैध ठरवलाय. या विरोधात मुंडे यांनी अपील दाखल केलीय. अर्जावर त्यांचा कायमस्वरूपी निवासी पत्ता त्यांनी मुंबईचा दाखवला असला तरी त्यासाठीचे सबळ पुरावे नाहीत असं एमसीएचं म्हणणं होतं. त्यासाठीची मुंडेंना देण्यात आलेली तीन दिवसांची मुदत आज संपतेय.

 

या पार्श्वभुमीवर मुंडे आपली बाजू मांडण्यासाठी एमसीए समोर आज अपील दाखल केली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पुन्हा एमसीएची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्यापाठोपाठ राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांना लढत देणारे गोपीनाथ मुंडेंही निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. मात्र मुंबईत कायस्वरुपी वास्तव्य नसल्याचं कारण देत मुंडेंचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

 

 

त्यामुळे मुंडे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले. आपला अर्ज अवैध ठरवण्यामागे पवारांचाच हात असल्याचा आरोप मुंडेंनी केला. आता या प्रकरणी मुंडेंनी अपील दाखल केली असून आज त्यावर एमसीए निर्णय देणार आहे. एससीए काय निकाल देणार यावर गोपीनाथ मुंडेंच्या उमेदवारीचं भवितव्य ठरणार आहे.

close