सिंचन घोटाळ्याबाबत कागदपत्र द्या, चितळे समितीचं तावडेंना पत्र

October 15, 2013 6:40 PM1 commentViews: 223

Image img_226662_vinoadtavade_240x180.jpg15 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्या प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी चितळे समितीवर आरोप केला होता. आता या प्रकरणी सिंचन घोटाळ्याशी संबंधीत तुमच्याकडे काही कागदपत्र असतील ते सादर करा अशी मागणी चितळे समितीने तावडेंकडे केली.

 

या प्रकरणी तावडे यांना चितळे समितीचं पत्र आलंय. अनेक वेळा मागणी करूनही समिती पुरावे मागत नाही असा आरोप तावडेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांनी यासंदर्भात समितीला तसं पत्रही लिहिलं होतं.

 

आता तावडे काय पुरावे सादर करतात आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Sandip Bhoi

    आता तावडे काय पुरावे सादर करतात आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येतात का?

    दादांकडून काही ऑफर यायच्या आत तावडे साहेब लवकरात लवकर पुरावे सादर करा. असमर्थ आणि दुर्बळ विरोधी पक्षामुळेच ही मजा चालली आहे.

close