बाबरी मशीद पाडणं ही चूक होती – कल्याणसिंग

February 4, 2009 4:28 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्याबरोबर हातमिळवणी केल्यानं समाजवादी पक्षावर मोठी टीका होत आहे. रामजन्मभूमी प्रकणातले कल्याणसिंग हे मुख्य सूत्रधार होते. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. आता त्यांनी या प्रकरणाबद्दल चक्क दिलगिरी व्यक्त केली आहे. जे काही घडलं त्याची पूर्णर् नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कल्याणसिंग यांनी याबाबत एक लेखी निवेदन प्रसिद्ध केलंय. बाबरी मशिदीच्या प्रकरणानंतर विवेकाला जागून आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, समाजवादी पक्षानं कल्याणसिंग यांच्याशी कोणतीच आघाडी केली नसल्याचं मुलायमसिंग यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे कल्याण सिंग यांचे पुत्र राजवीर सिंग यांना समाजवादी पक्षानं सरचिटणीस केलं आहे.

close