सावत्र बापाकडून चिमुरडीवर अमानुष अत्याचार

October 15, 2013 9:50 PM1 commentViews: 923

Image img_236342_delhirapegandhingar_240x180.jpg15 ऑक्टोबर : नात्याला काळिमा फासणारी घटना धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. एका सावत्र बापानं आपल्या 5 वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार केलेत. गंगापूर रोडवरच्या पंपिंग स्टेशन परिसरात एका बंगल्यातल्या वॉचमनच्या कुटुंबात हा प्रकार घडलाय. सावत्र बापानं या मुलीच्या शरीरावर ब्लेडनं वार केले.

 

धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुलीला जखमी अवस्थेत सोडून आईबाप फरार झाले. रडणार्‍या मुलीला शेजार्‍यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिची मेडीकल तपासणी केली असता तिच्या गुप्तांगांवरही जखमा केल्याचं पुढे येतंय.

 

तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचीही शक्यता आहे. सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल होत आहे. मुलीच्या आईला शोधून काढण्याचं पोलिसांपुढचं पहिलं आवाहन आहे.

  • santosh

    aai vadil ya doghanha pakdun fashi dya punha ase krutya koni karnar nahi lahan chimurdi ver jara daya nahi ali ya kutrayanha

close