ओबामांच्या मंत्रिमंडळातल्या 2 सदस्यांचा राजीनामा

February 4, 2009 4:32 PM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीओबामांच्या मंत्रिमंडळातल्या दोन सदस्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मंत्रिमंडळातल्या सदस्यांची निवड करताना काही चुका झाल्या, अशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. या सदस्यांची करचुकवेगिरी चव्हाट्यावर आल्यानं ओबामांच्या मंत्रिमंडळातल्या या दोन सदस्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ओबामा यांनी या चुकीची जबाबदारी घेतली आहे. आपल्या प्रशासनाचं धोरण दुटप्पी असू शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं.

close