‘आदर्श’ प्रकरणी शिंदेंना क्लिन चीट

October 15, 2013 10:20 PM0 commentsViews: 181

sushilkumar shinde15 ऑक्टोबर : आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळालाय. शिंदेंच्या विरोधात पुरेसे पुरावे नाहीत, त्यामुळे शिंदे यांना आरोपी केलं नाही असं सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलंय. सीबीआयनं आज याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलंय. यात शिंदेंना पुन्हा क्लिन चिट देण्यात आलीय.

 

सीबीआय प्रतिज्ञापत्रात हायकोर्टात सादर करणार या अगोदरच शिंदे यांना क्लीन चिट दिली गेली होती. मेजर खानखोजे यांना आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळावा याासाठी शिंदे यांनी शिफारस केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांना या प्रकरणात आरोपी ठरवण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केली होती.

 

पण, मेजर खानखोजे हे शिंदेंशी संबंधित नव्हते. शिवाय खानखोजे आणि कन्हैयालाल गिडवाणी दोघंही आता हयात नाही. त्यामुळे गिडवाणी यांनी आदर्श आयोगासमोर दिलेलं निवेदन ग्राह्य धरता येत नाही, असं सीबीआयने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं याच्या आधार शिंदेंना क्लीन चीट देण्यात आली होती. दरम्यान, आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल आणि त्याबाबतचा सरकारचा ऍक्शन टेकन रिपोर्ट, यांच्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलीय.

close