‘प्रियांका गांधींनी नेहरूंच्या मतदारसंघातून लढावं’

October 15, 2013 11:02 PM0 commentsViews: 53

priyanka gandhi415 ऑक्टोबर : प्रियांका गांधींनी लोकसभा निवडणुकीला उभं रहावं असा ठराव अलाहबाद काँग्रेसने मंजूर केलाय. जवाहरलाल नेहरूंच्या फुलपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी अलाहबाद काँग्रेसने केली आहे.

 

यासंबंधी एक पत्रंही पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पाठवण्यात आलंय. प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरतील अशी माहिती सोमवारी काँग्रेस सूत्रांनी दिली होती.

 

काँग्रेसने मात्र त्याचा इन्कार केला होता. पण, अलाहबाद काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावामुळे काँग्रेस मोदींविरोधात प्रियांका गांधींना प्रचारात उतरवणार का, अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय.

close