साखर कामगारांना पाचवं वेतन देणार -मुख्यमंत्री

October 15, 2013 10:22 PM0 commentsViews: 377

Image img_236532_cmonfarmarlaon_240x180.jpg15 ऑक्टोबर : आजारी सहकारी साखर कारखान्यांची यापुढे विक्री किंवा खासगीकरण होणार नाही तसंच महामंडळाच्या कामगारांना पाचवं वेतन आयोग ताबडतोब देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 

साखर कामगारांची थकीत बाकी लवकर निकाली काढण्यात येणार आहेत. यापुढे साखर कामगारांचा पगार चेकनं दिला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये साखर कामगारांचं राज्यव्यापी अधिवेशन झालं. यावेळी ते बोलत होते.

 

मात्र या कार्यक्रमात चर्चा झाली ती पवार काक पुतण्यांच्या गैरहजेरीची. राष्ट्रवादीचेच नेते जयंत पाटील यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे फिरकले नाहीत.

close