हर्षवर्धन पाटील यांची मुलाखत

October 15, 2013 11:24 PM0 commentsViews: 764

15 ऑक्टोबर : सहकार क्षेत्रात घोटाळा करणार्‍यांवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलाय. आयबीएन-लोकतमशी त्यांनी खास बातचीत केलीय.आपला एकही साखर कारखाना नाही, कुटुंबीयांच्या नावानं एक कारखान आहे, पण तो नवीन नियमानुसार घेण्यात आला असून कारखाना विक्रीत कोणतीही मिलीभगत नसल्याचंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं.
पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • 1) अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या परिस्थितीला त्या त्या कारखान्याचे संचालक जबाबदार
  • 2) सहकारी साखर कारखाने विक्री घोटाळ्याच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल. दोषींविरूद्ध कारवाई करू
  • 3) न्यायालयीन चौकशीला घाबरत नाही
  • 4) साखर कारखान्याची विक्री बँक स्थरावर, शासन जिम्मेदार नाही
  • 5) माझा एकही खासगी कारखाना नाही, बंद पडलेला कारखाना विकत घेतला नाही. कुटुंबीयांच्या नावानं एक कारखाना आहे पण तो नवीन नियमानुसार
  • 6) साखर कारखाना विक्रीत मिलीभगत नाही, मलीदा खाल्ला नाही
  • 7) सहकार संस्थांच्या अधोगतीला सहकार खातं जबाबदार नाही पण आत्मपरीक्षणाची गरज असून कठोर पावलं उचलली पाहिजेत
close