सेनेनं दिला जोशींना कर्म करण्याचा धडा !

October 16, 2013 3:15 PM0 commentsViews: 1405

manhoar joshi16 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यात अपमानाट्यानंतर दोन दिवसांनी शिवसेनेनं ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यावर ताशेरे ओढलेत. आज प्रसिद्ध झालेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखामध्ये जोशींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आलीये.

 

शिवसेना फक्त सत्तेसाठी नाही, शिवसेनेत बेबंदशाही चालणार नाही आणि हे दसरा मेळाव्यात हे दाखवून देण्यात आले आहे, असं या अग्रलेखात म्हटलंय. मनोहर जोशींना आतापर्यंत जी काही पदं मिळाली त्यामागं शिवसैनिकांची मेहनत होती.

 

शिवसेनेत यापुढेही नवीन प्रयोग होत राहतील, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्यामुळे, हा सर्वच ज्येष्ठ नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचं मानलं जातंय.

 
जोशींना चिमटे
‘शिवतीर्थावर जे सामर्थ्य प्रकटले ते सामर्थ्य फक्त शिवसेनाप्रमुखांचेच होते. जो अंगार उसळला होता त्यामागे फक्त शिवसेनाप्रमुखांचीच ज्वलंत प्रेरणा आहे. शिवसैनिकांनी घाम आणि रक्त गाळून विजय मिळवले नसते तर कुणी या पदांची स्वप्ने पाहू शकले असते काय? तुझा कर्मावर अधिकार आहे पण कर्माच्या फळावर अधिकार नाही. आम्हीही दसरा मेळाव्यात बेबंदशाहीस थारा नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ‘सुधारणा करायला जाणे फार धोक्याचे असते.कारण अनेकांना बदल नको असतो. आहे त्याच स्थितीत ज्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत ते अंत्यत जोरात विरोध करतील.’
 

close